Home क्राईम अवघ्या आठ मिनिटात चोरट्यांनी दोन मोबाईल लांबविले

अवघ्या आठ मिनिटात चोरट्यांनी दोन मोबाईल लांबविले

0
33

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील खान्देश मिल कॉलनी परिसरात तरुणाच्या घरातून त्याचे दोन मोबाईल चोरट्याने चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील खान्देश मिल कॉलनी येथे कौशल सुनील जैन वय २३ हा तरुण वास्तव्यास आहेत. २६ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने घरातील कौशल याचे १४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरुन नेले. अवघ्या आठ मिनिटात चोरट्याने ही चोरी केली, घरात मोबाईल मिळत नसल्याने कौशल याने शोध घेतला, मात्र मोबाईल मिळून आले नाही, अखेर चोरीची खात्री झाल्यावर तीन दिवसानंतर सोमवारी दुपारी कौशल याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound