Home राजकीय देशातील कमजोर वर्गाच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कटीबद्ध : राहुल गांधी

देशातील कमजोर वर्गाच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कटीबद्ध : राहुल गांधी


rahul gandhi 4
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विद्यमान सरकार देशात द्वेष पसरवत आहे. परंतु, देशातील कमजोर वर्गाला मोदींच्या चुकींच्या धोरणांपासून वाचविण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी वायनाड मतदार संघात आभार रॅलीत राहुल बोलत होते. दरम्यान, राहुल दोन दिवसाच्या वायनाड दौऱ्यावर आहेत.

 

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी सरकार देशात द्वेष पसरवत आहे. परंतु द्वेष संपविण्यासाठी केवळ प्रेमाची गरज असल्याचे काँग्रेसला माहित आहे. देशातील कमजोर घटकांना वाचविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मी तुमचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी तयार असून वायनाडचा विकास करण्यासाठी सज्ज असल्याचे राहुल यांनी म्हटले. राहुल वायनाड येथे पोहोचल्यानंतर हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound