जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिध्दार्थ नगरात दारुच्या नशेत काही एक कारण नसतांना दोन जणांनी तरुणाला मारहाण केली तसेच त्याच्या आई वडीलांना शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील सिध्दार्थ नगरात सुरेखा अविनाश मोरे ह्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. १७ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास परिसरात राहणाऱ्या युवराज गोमा भालेराव व विजय युवराज भालेराव या दोघांनी एकही एक कारण नसतांना दारुच्या नशेत सुरेखा मोरे यांच्या मुलाला लाकडी काठीने मारहाण केली, याच दोघांनी सुरेखा मोरे यांच्यासह त्यांच्या पतीला शिवीगाळ करत, इथुन निघून जात नाही तर तुम्हाला काठी मारुन डोके फोडेन अशी धमकी दिली. या माहराणीत सुरेखा मोरे यांचा मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी सुरेशा मोरे यांच्या तक्रारीवरुन युवराज गोमा भालेराव व विजय युवराज भालेराव या दोघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रध्दा रामोशी हे करीत आहेत.