खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ व भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात फरात असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार, १७ मार्च जळगाव शहरातील खोटेनगर येथून सापळा रचून अटक केली आहे. योगेश ऊर्फ सोनू हिरालाल मोघे वय २८ रा. आगवाली चाळ, रा.भुसावळ हल्ली मुक्काम पंचवटी, नाशिक असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

 

खूनाच्या गुन्ह्यातील मारेकरी असलेल्या भावाचा जामीन करण्यासाठी योगेश ऊर्फ सोनू याने खंडणी मागितल्याप्रकरणी भुसावळ शहर व भुसावळ बाजारपेठ अशा दोन्ही पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होते, या गुन्ह्यात योगेश ऊर्फ हा फरार होता. सोनू हा जळगाव शहरातील खोटेनगर येथे त्याची ओळख लपवून राहत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हवालदार संदीप सावळे, पोलीस नाईक रणजीत जाधव, पोलीस क्रीष्णा देशमुख, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर याच्या पथकाने बुधवारी सापळा रचून खोटेनगरातून संशयित योगेश ऊर्फ सोनू यास अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.,

Protected Content