Home Cities एरंडोल श्री क्षेत्र पद्मालय मंदीर आवारात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

श्री क्षेत्र पद्मालय मंदीर आवारात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0
104

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद गावाजवळ प्रसिध्द पद्मालय येथील गणपती मंदीर परिसरात संकष्टी चतुर्थीनिमित्त गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

पद्मालय येथील गणपती मंदीर परिसरात दर महिन्यांच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी गणपती दर्शनासाठी जिल्हाभरासह इतर जिल्ह्यातील भाविक देखील दर्शनासाठी गर्दी करत असतात. यात महिला, पुरूष व अबाल वृध्दांचा देखील समावेश असतो. या अनुषंगाने गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसिध्द पद्मालय येथील गणपती मंदीर परिसरात संकष्टी चतुर्थीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी वैद्य डॉ. उदय तल्हार यांनी विविध आजारांवर मोफत उपचार केले. यात पायातील कुरूप, चेहऱ्यावरील मस, काळे डाग, अंगावरील गाठी, गोंदलेले मिटविणे यासह आदी आजारांवर शिबीरात मोफत उपचार करण्यात आले. गेल्या दोन संकष्टी चतुर्थीला जनतेतून मोठ्या प्रमाणात या शिबीराचा लाभ घेण्यात आला आला.


Protected Content

Play sound