दुचाकी अपघातात वृध्द महिला गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील द्वारका नगर जवळील रोडवर पुढे जात असलेल्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील ६५ वर्षीय वृद महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवार २ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी ३ मे रोजी रात्री ९ वाजता दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, धनराज गुलाब पाटील वय ५० रा. इंद्रनिल नगर, जळगाव हे गुरूवारी २ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएन ६२५४ ने मिराबाई पंढरीनाथ पाटील वय ६५ रा. द्वारका नगर, जळगाव यांना सोबत घेवून द्वारका नगर येथील रोडने जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे असलेल्या मिराबाई पाटील या वृध्द महिला जखमी झाल्या. या अपघात प्रकरणी शुक्रवारी ३ मे रोजी रात्री ९ वाजता धनराज पाटील यांनी तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीधारक शशिकांत रविंद्र कोळी रा. खेउी कढोली ता. एरंडोल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे.

Protected Content