Home क्राईम मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण : कोर्टाच्या प्रश्नांवर साध्वी प्रज्ञासिंहकडून ‘मला माहित नाही’चे...

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण : कोर्टाच्या प्रश्नांवर साध्वी प्रज्ञासिंहकडून ‘मला माहित नाही’चे उत्तर



मुंबई (वृत्तसंस्था) मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात हजेरी लावली. कोर्टाने त्यांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यासंदर्भात काही प्रश्न विचारले यावर ‘मला माहिती नाही’, अशा स्वरुपाची उत्तरे त्यांनी कोर्टासमोर दिली.

 

आज एनआयए कोर्टात मालेगाव स्फोटाची सुनावणी सुरू झाली. आतापर्यंत साक्षीदारांच्या साक्षीवरून २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता, असे समोर आले आहे. यावर आपल्याला काही बोलायचे आहे का?, असे कोर्टाने विचारले. यावर आपल्याला काही माहित नसल्याचे प्रज्ञासिंग ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर कोर्टाने आतापर्यंत किती साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आली याची माहिती तुम्हाला तुमच्या वकिलाने दिली का?, या प्रश्नावरही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, 3 जूनला मुंबईच्या एनआयए कोर्टाने प्रज्ञा यांना आठवड्यातून दोनवेळा कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रज्ञा यांनी प्रकृतीचे आणि संसदेतील औपचारिकतेचे कारण देत सुट्टीची विनंती केली होती, पण विशेष न्यायालयाने अमान्य केली होती.

29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएसला दिला होता. 24 ऑक्टोबर, 2008 या प्रकरणात स्वामी असीमानंद, कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा सिंह यांना अटक करण्यात आली होती, तर 3 आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. एप्रिल 2017 मध्ये साध्वी प्रज्ञा यांना 9 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सशत्र जामीन मिळाला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound