जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत घरगुती वादातून प्रौढाला त्याच्या नातेवाईक असलेल्या दोघांनी लोखंडी रॉड मारुन दुखापत केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत राजेंद्र अर्जुन चौधरी वय ४८ हे वास्तव्यास आहेत. त्यांचा त्यांचे रामेश्वर कॉलनीतच राहणाऱ्या निवृत्ती रामा चौधरी व भारती अर्जून चौधरी यांच्यासोबत घरगुती वाद आहे.या वादातून निवृत्ती चौधरी व भारती चौधरी या दोघांनी शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राजेंद्र चौधरी यांच्या भांडण करत त्यांच्या नाकावर लोखंडी रॉड मारुन दुखापत केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर रात्री साडेअकरा वाजता जखमी राजेंद्र चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन निवृत्ती चौधरी व भारती चौधरी या दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.