Home Uncategorized जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
293

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज ।  शहरातील कांचन नगर परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार ५ मे रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, कांचन नगर परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार २ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून आली नाही, अखेर शुक्रवार ५ मे रोजी सकाळी ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदल करीत आहे.


Protected Content

Play sound