
यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निळे निशाण सामाजिक या संघटनेच्या वतीने भगवान बुध्द जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.

युवासेनेची समता संदेश मोटरसायकल रॅली मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली .
यावल तालुक्यातील मोहराळा येथे शुक्रवार रोजी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाने सावदा रेल्वे स्टेशन ता रावेर येथिल महामानव विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून ते मोहराळा येथील विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत निळे निशाण सामाजिक संघटना युवासेनेच्या वतीने समता संदेश मोटर सायकल रॅली काढण्यात आली.
विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्धाची मूर्ती रॅली सावदा स्टेशन मार्ग पासुन सावदा , फैजपुर , हंबर्डी , हिंगोणा , सांगवी , चितोडा , यावल , विरावली , कोरपावली मार्गे मोहराळा पर्यंत सुमारे ३५ किलोमिटर लांबीचा प्रवास करून मोहराळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
येथे विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृतीच्या पुतळाचे नुतनीकरणाचे शुभारंभ निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते .
दरम्यान, या रॅलीचे आयोजन निळे निशाण सामाजिक संघटना युवासेना सागर बाविस्कर यांनी केले होते . समता संदेश मोटर सायकल रॅलीचे नेतृत्व संघटनेचे जळगाव जिल्हा उपप्रमुख अशोक तायडे , फैजपुर विभाग उपप्रमुख विलास भास्कर , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , यावल तालुका युवक अध्यक्ष सतीश अडकमोल , इकबाल तडवी यांनी केले तर मोटर सायकल रॅली यशस्वी करण्याकरिता वासुदेव महाजन , अनिल धनगर , चंद्रकांत कोळी , राहुल तायडे , सुमित बाविस्कर ,योगेश साळवे , प्रमोद तायडे , रोशन मेढे , अनिकेत मोरे यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.



