Home क्राईम कला वसंत नगरातून एकाची दुचाकी लांबवली

कला वसंत नगरातून एकाची दुचाकी लांबवली

0
49


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आसोदा रेल्वे गेट परिसरात असलेल्या कला वसंत नगर येथील घरासमोर उभी दुचाकी चोरून नेल्याची घटना गुरुवार 27 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता समोर आले आहे याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील आसोदा रेल्वे गेट परिसरात कला वसंत नगर येथे निलेश प्रकाश तांबट हे वास्तव्यास आहेत. निलेश तांबट यांनी 26 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांची एम एच 19 बी व्ही 78 07 या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेच्या सुमारास घरासमोर उभी केलेले दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने निलेश तांबट यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली . या तक्रारीवरून 25 हजार रुपयांची दुचाकी चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वासुदेव मराठे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound