जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरहून पैसे आणावे या मागणीसाठी विवाहितेला मारहाण करून शरिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा येथे माहेर असलेल्या तरन्नुमबी अब्दुल रहिम शेख (वय-२२) यांचा विवाह शाहू नगरातील शेख अब्दुल रहिम शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला माहेरहून पैसे आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाव व दमदाटी करण्यात आली. त्यानंतर सासू, सासरे, नणंद, जेठ यांनी देखील पैशांची मागणी केली करत छळ केला., हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर बुधवारी २६ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शेख अब्दुल रहिम शेख वाहब, शेख वाहब शेख रशिद, सासू जरिनाबी शेख वाहब शेख, नणंद अलमाजबी शेख सलमान, तनजीलबी शेख इरफान आणि जेठाणी समरीनबी रउफ शेख सर्व रा. शाहू नगर जळगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनराज निकुंभ करीत आहे.