Home क्राईम बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । गावाला जाण्यासाठी जळगाव बसस्थानकात बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची पोत लांबविल्याची घटना सोमवार २४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील लिलादेवी जयप्रकाश रुणवाल या वृद्ध महिला पती, नणंद सविता अच्छा, मुलगा व सूनेसोबत २० एप्रिल रोजी देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर भाचा रितेश छोरिया याला भेटण्यासाठी रविवारी २३ रोजी जळगावात आले. दुसर्‍या दिवशी सोमवारी २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रुणवाल या जालना जाण्यासाठी नवीन बस स्थानकात आले. याठिकाणी (एमएच २० बीएल ३७६३) क्रमांकाची यावल-लातून बस लागली होती. रुणवाल कुटुंबिय बसमध्ये चढत असतांना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची पोत लांबविली. पोत चोरट्याचे लक्षात येताच रुणवाल यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound