उभ्या रस्त्यावरील कारच्या काचा फोडून ७५ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्टेडीयम परिसरातील मणियार सुपर शॉपीजवळील रस्त्यावर उभ्या कारच्या काचा फोडून ४२ हजार रूपयांची रोकड, सोन्याची अंगठी आणि मोबाईल असलेली असा एकूण ७५ हजारांचा एैवज असलेली बॅग लांबविल्याची घटना घडली.

 

नंदगाव येथील अमोल कारभारी पाटील हा तरुण सोमवारी सकाळी (एमएच ४८ पी ९७१०) क्रमांकाच्या कारने बहिणीच्या वैद्यकीय तपासणीसाठी जळगावात आला होता. बहिणीची सासू व सासरे हे आडगाव येथून बसने नवीन बसस्थानक येथे उतरले होते. त्यामुळे त्यांनाही सोबत घेवून अमोल हा खासगी रूग्णालयात गेला होता. रूग्णालयातील काम आटोपून दीड वाजेच्या सुमारास ते ड्रायफ्रुट घेण्यासाठी स्टेडीयम परिसरातील मणियार सुपर शॉपीमध्ये आले होते. दुकानाच्या बाजूलाच अमोल याने कार पार्क केली होती. मात्र, खरेदी करून बाहेर आल्यानंतर त्यांना कारची मागची काच फोडलेली दिसून आली. तर मागच्या सीटवर ४२ हजार रूपयांची रोकड, २५ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि मोबाईल असलेली बॅग व दुसरी महत्वाचे कागदपत्र असलेली बॅग गायब झालेली दिसून आली. आजू-बाजूला त्यांनी बॅगचा शोध घेतला. पण, बॅग चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख हे करीत आहेत.

Protected Content