Home Uncategorized भारतीय जैन संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विनय पारख

भारतीय जैन संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विनय पारख

0
34

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम व्यावसायिक तथा समाजसेवक विनय पारख यांची भारतीय जैन संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

‘पारख प्लेक्सेस रिऍल्टी लिमिटेड’ अर्थात ‘पीपीआरएल’चे प्रमुख विनय पारख यांची भारतीय जैन संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीजेएसच्या सर्व प्रकल्पांमध्ये हिरीरीने सहभागी होणार्‍या विनयजी यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कामांची पावती यातून संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली असून त्यांना अतिशय मानाचे मानले जाणारे पद बहाल केले आहे. आगामी काळात बीजेएसच्या माध्यमातून विविधांगी सामाजिक कामांना गती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भारतीय जैन संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विनय पारख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. भारतीय जैन संघटनेचे जळगाव शहराध्यक्ष उदय कर्णावट, राज्याध्यक्ष नंदकिशोर सांखला, सचिव दीपक चोपड़ा आणि खान्देश विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक श्रीश्रीमाळ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले.


Protected Content

Play sound