डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथीक महाविद्यालयात अवयवदान जनजागृती अभियान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य वर्षानिमित्त तसेच होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनितिमित्‍त डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथीक महाविद्यालयातर्फे सोमवार १० एप्रिल रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, डॉक्टरांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथीक महाविद्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी रॅलीला प्राचार्य डॉ. डी.बी पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, फिजीओथेरपीचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, होमिओपॅथीचे प्राचार्य डॉ.डी.बी.पाटील, डॉ.अमोल चोपडे, डॉ.पंकज शर्मा, डॉ.श्वेता डांगरे, डॉ.पूजा पाटील, डॉ.दिव्या गोगिया हे उपस्थीत होते. याप्रसंगी अ‍ॅनॉटॉमी विभागातील प्रा.डॉ.शुभांगी घुले यांनी अवयवदान याबद्दल माहिती विशद केली.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. डी.बी. पाटील यांनी सांगितले की योग्य व्यायाम, योग्य आहार, योग्य विहार, योग्य विचार, योग्य दिनचर्या हीच दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. तसेच अवयव दानाचे महत्त्व, आरोग्य योग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले. यावेळी पोस्टर स्पर्धा व निबंध स्पर्धा देखील घेण्यात आली. यावेळी श्रद्धा उपाध्ये, वैष्णवी नेवे, माधुरी पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सफुरा बासीत, जागृती शमनानी यांनी तर आभार मयुरी शिंपी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलेश सोनवणे, अंकिता कदम, अभिजीत कालबांडे, वसंत बडगुजर, अश्विनी चौधरी, रुषिका पाटील, प्रियल मांडलेचा, मृणाल सुरवाडे, श्रद्धा पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content