गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘फिनिक्स २०२३’ चे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे व आपल्या सुप्त गुणांना चालना मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स २घ२३ (टेक्निकल इव्हेंट) चे आयोजन विद्यार्थ्यांसाठी दिनांक ११ एप्रिल २०२३ या दिवशी करण्यात आले आहे.

फिनिक्स २०२३ हा एक विद्यार्थ्यांसाठीचा टेक्निकल इव्हेंट असून त्यात विविध प्रकारच्या इव्हेंट्स चा समावेश केलेला आहे. त्यात पोस्टेरॉलिक कॉम्पिटिशन, कॅड मॅडनेस, शार्क टँक, वेब स्पार्क, ब्लाइंड कोडींग, इक्वेशन मेनिया तसेच प्रोजेक्ट एक्जीबिशन अशा प्रकारचे इव्हेंट्स आहेत.कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर हे उपस्थित असणार आहे. तसेच कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून डॉ.गजानन माळवटकर (प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), श्री विनोद पंडित(मॅनेजर, जैन फार्म फ्रेश, जळगाव),डॉ. पराग एम. पाटील(प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव) उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे या इव्हेंट साठी डॉ.वर्षा पाटील (सचिव, गोदावरी फाउंडेशन), डॉ. केतकी पाटील (सदस्या, गोदावरी फाउंडेशन),डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट) यांची उपस्थिती असणार आहे.या टेक्निकल इव्हेंट मध्ये जळगाव जिल्हा तसेच धुळे, मलकापूर, बुलढाणा, नंदुरबार या भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मध्ये सहभाग नोंदविला आहे.

महाविद्यालयामध्ये दि. ११ एप्रिल रोजी इव्हेंटच्या दिवशी स्पॉट एन्ट्रीज सुद्धा स्वीकारल्या जातील. तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती नोंदवावी. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत प्रथम पारितोषिक ३००० रुपये, द्वितीय पारितोषिक २००० रुपये व तृतीय पारितोषिक १००० रुपये असे बक्षीस तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख व समन्वयक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा यासाठी आवाहन केले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळेल.फिनिक्स २घ२३ या टेक्निकल इव्हेंट चे समन्वयक प्रा.तृषाली शिंपी या आहेत.

Protected Content