Home धर्म-समाज प्रामाणिकपणा: नवरदेवाची हरवलेली १ तोळ्याची अंगठी केली परत

प्रामाणिकपणा: नवरदेवाची हरवलेली १ तोळ्याची अंगठी केली परत

faizpur
faizpur

faizpur

फैजपूर(प्रतिनिधी)। माणुसकी हरवत चालली आहे, अशी नित्य ओरड होत असलेल्या वातावरणात पुन्हा एकदा माणुसकीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन घडले आहे. चिनावल येथे एका नवरदेवाच्या हातातील १ तोळ्याची अंगठी लग्नाच्या दिवशी हरवली होती. खूप शोधाशोध करुनही ती सापडली नाही. त्यामुळे सगळे बेचैन झाले होते. पण नवरदेव नवरीच्या मित्रांनी ती अंगठी त्यांच्या हवाले केली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, चिनावल तालुका रावेर येथील प्रफुल्ल डिगंबर कोल्हे या नवरदेवाची रोझोदा (तालुका रावेर) येथील कामसिद्ध मंदिरावर दिनांक 31 मे रोजी विवाह संपन्न झाला. नवरदेव प्रफुल्ल यास आहेरामध्ये मिळालेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी (आजच्या बाजारभावाने बत्तीस हजार रुपये किमतीच होती नाचण्यासाठी नवरदेवाला घोड्यावरून खाली उतरवले असता लग्न मंडपा जवळ पडून गेली. नवरदेव नवरी घरी आल्यानंतर त्यांना आपल्या बोटातली अंगठी हरवल्याचे समजले, पण इलाज नव्हता कोणाला विचारणार आणि कोणी कोणाकडे सांगणार, अशी परिस्थिती त्यांची झाली होती.

परंतु लग्नासाठी उपस्थित असलेले नवरीचे व नवरदेवाचे मित्र फैजपूर येथील भूषण भंगाळे हे जे.टी.महाजन अभियांत्रिकि महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीस आहे भंगाळे यांचा नवरदेव प्रफुल्ल यांना फोन आला की तुमची हरवलेली अंगठी आम्हाला सापडली आहे. आम्ही तुमच्या घरपोच आणून देतो. या दोघा मित्रांनी हे हरवलेली अंगठी चिनावल येथे नवविवाहितांच्या घरी येऊन परत केली. फैजपूर येथील रहिवासी असलेले भूषण भारंबे यांनी एक तोळे सोन्याची अंगठी सापडल्याचा कोणताही स्वार्थ न करता नवविवाहित दांपत्याला परत केले या त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल चिनावल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. तसेच नवरदेवाचे वडील दिगंबर कोल्हे यांनी भूषण भंगाळे यांचा प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या घरी सत्कार केला. जगात प्रामाणिकपणा शिल्लक आहे याचा प्रत्यय आणून दिला याबद्दलआभार त्यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound