पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील राजपूत समाजाचे निष्ठावंत सेवाभावी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब हिलाल पाटील (राजपूत) यांना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच त्यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांचा दुहेरी सन्मान झाला आहे.
जळगाव येथे संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला. समाजहित, राष्ट्रहित आणि मानवतेच्या सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत बाळासाहेब पाटील यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.




