Home Agri Trends कृषि विभागातर्फे तालुकास्तरीय पाककला स्पर्धा उत्साहात

कृषि विभागातर्फे तालुकास्तरीय पाककला स्पर्धा उत्साहात


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुका कृषि अधिकारी कार्यालयातर्फे शासकीय फळ रोपवाटीका येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे २०२३च्या निमित्ताने आयोजित तालुकास्तरीय पाककला स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याहस्ते बुधवारी २९ मार्च रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले.
याप्रसंगी यावेळी तालुका कृषि अधिकारी डॉ. अभिमन्यू चोपडे, मंडळ कृषि अधिकारी धनश्री चासकर, मंडळ कृषि अधिकारी निता घार्गे, मंडळ कृषि अधिकारी अशोक वाळके उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिपाली पाटील हिवरखेडे बु, द्वितीय पारितोषिक राजश्री प्रदिप महाजन जामनेर, तृतीय पारितोषिक सरला पाटील ओझर बु, उत्तेजनार्थ संध्या किशोर पवार जामनेर, उत्तेजनार्थ रेखा शांतीलाल पांडे पळासखेडा मिराचे या विजेत्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  सहभाग घेतलेल्या सर्व महिलांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये ४० महिलांनी सहभाग नोंदविला. यावेळी डॉ. सारिका शेठ, प्रा. मनिषा चावरिया,निशा तेली महिला बालविकास अधिकारी पंचायत समिती जामनेर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

Protected Content

Play sound