Home Cities जळगाव चिमुकल्यांनी पूर्ण केला रमजानचा एक उपवास !

चिमुकल्यांनी पूर्ण केला रमजानचा एक उपवास !


बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पवित्र रमजान महिन्यात बोदवड शहरातील जाफर मणियार फोटोग्राफर यांचा पुतण्या तसेच रोशन मणियार यांची मुलगी इशरत जहा व मोहम्मद रजा शेख नईम मण्यार यांनी रोजा पूर्ण केला आहे.

सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी पाच वाजेला सहेरी(जेवण) करून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ना अन्न ना पाणी घेता उपाशी पोटी राहून मोहम्मद रजा आणि इशरत जहा या दोघांनी अल्लाह प्रती श्रद्धा व्यक्त केली. सध्या बोदवड शहराचे तापमान ४० ते ४२ अं.से. तापमानाची पातळी बघावयास मिळत आहे. इतक्या उन्हात सामान्य माणसाल बाहेर फिरणे कठीण आहे. लोकांना उन्हाचा त्रास होत आहे इतक्या कठीण परिस्थितीत रखरखत्या उन्हात मोहम्मद रजा व इशरत जहा या दोघांनी अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त करत रमजान चा उपवास यशस्वीरित्या पूर्ण केला.
वयाच्या नऊव्या वर्षी मोहम्मद रजा आणि इशरत जहा याने आपल्या जीवनाचा रमजान चा एक रोजा (उपवास) पूर्ण केल्याबद्दल या मोहम्मद रजा मण्यार याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound