चोरीस गेलेली आयशर हस्तगत : आरोपी जेरबंद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भोकरी येथून चोरीस गेलेली आयशर पोलिसांनी हस्तगत केली असून या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

तालुक्यातील भोकरी (वरखेडी) येथुन दि. २१ मार्च रोजी अज्ञात चोरट्याने रशिद काकर रा. भोकरी ता. पाचोरा यांची आयशर (क्रं. एम. एच. १९ – झेड – २९२८) हे वाहन अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले होते.

 

या घटनेप्रकरणी रशिद काकर यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन गु. र. नं. ५९ / २०२३ भा. द. वि. ३७९ याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत गुन्हा उघडकीस आणून आयशर या वाहनाचा शोध घेत असतांना सदरील वाहन हे अहमदाबाद येथे असल्याची गोपनीय माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले.

 

या पथकाने अहमदाबाद येथून चोरीस गेलेले आयशर वाहन व या गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकलसह आरोपी कुर्शाद अहमद यास अटक केले आहे. सदरची कारवाई पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय माळी, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल गोकुळ सोनवणे, जितेंद्र पाटील, अभिजित निकम, संभाजी सरोदे, दिपक पाटील या पथकाने केली आहे.

Protected Content