भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रेल्वे स्थानकावर संपर्क क्रांती एक्सप्रेसला थांबा मिळाला असून याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले आहे.
मध्य रेल्वे अंतर्गत भुसावळ स्टेशन येथे नांदेड ते निजामुद्दीन (गाडी क्र.१२७५३) व निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र.१२७५४) संपर्क क्रांती एक्सप्रेस गाडीस खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांमुळे थांबा देण्यात आलेला आहे. सदर गाडी क्र.१२७५३ व गाडी क्र.१२७५४ या दोन्ही ट्रेन्स ४ एप्रिल २०२३ पासून भुसावळला थांबणार आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यापासून आरक्षण सुविधा सुरु होणार आहे.
संपर्क क्रांती एक्सप्रेसला आजवर जळगाव रेल्वे स्थानकाला थांबा होता. ही रेल्वे गाडी भुसावळला थांबत नव्हती. आता मात्र खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी दोन्ही बाजूने धावणार्या या सुपरफास्ट एक्सप्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार असल्याने भुसावळसह परिसरातील प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.
रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, रावेर, सावदा, भुसावळ ई. स्टेशन व विविध रेल्वे गाड्यांना स्थांबा मिळणे बाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री श्री.आश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केले असता, आज सदर संपर्क क्रांती एक्सप्रेस गाडीस भुसावळ स्टेशन येथे थांबा देण्यात आला असून, इतर स्टेशन येथे काही महत्वाच्या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे अशी माहिती यावेळी खासदार कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे.