अरे बापरे. . .सुनेनेच काढला सासर्‍याचा काटा : तरूणाच्या मदतीने केला खून !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील वृध्दाच्या खून प्रकरणी त्यांच्याच सुनेसह एका तरूणाला अटक करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यावल तालुक्यातील किनगाव येथील राहणार्‍या ट्रकचालक साठ वर्षीय वृद्धाच्या खून प्रकरणाने परिसह हादरला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयीत म्हणुन वृद्धाच्या सुनेसह एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,तालुक्यातील किनगाव येथील भीमराव शंकर सोनवणे वय साठ वर्ष या वृद्धाचा मृतदेह किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली शुक्रवारी आढळून आला होता.

याबाबत खुन झालेल्या व्यक्तिच्या मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांनी यावल पोलीस ठाण्यात खून झाल्याची फिर्याद दिली होती . याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असतांना त्यांना सुनेवर संशय आला. यातून तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यात भीमराव सोनवणे यांनी आपल्या सुने कडे शरीर सुखाची मागणी केली असता सुनेने नाकारली. या वादातुन सुनेने संशयित आरोपी जावेद शाह अली शाह, (वय २८ रा . वरणगाव ह.मु. उदळी तालुका रावेर ) याच्या मदतीने सासरे भिमराव सोनवणे यांचा धारदार हत्याराने निर्युण खुन केल्याची माहिती समोर आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाते फिरवुन तात्काळ कारवाई करत या खुन झाल्या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी सुनेने प्राथमिक माहिती देतांना सासर्‍यावर आरोप लावला असला तरी याला अजून काही वेगळा आयाम आहे का ? या दृष्टीने पोलिसांची चौकशी सुरू आहे.

Protected Content