जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या गोरखपूर एक्सप्रेसमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. याबाबत शनिवारी रेल्वे पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
रेल्वे पोलीस यांनी दिलेली माहिती अशी की, रेल्वे गाडी क्रमांक (०१०२७) डाऊन गोरखपुर एक्सप्रेसमध्ये अंदाजे ३५ वर्षे एका अनोळखी पुरुषाचा आकस्मात मृत्यू झाल्याची घटना शनिवार १८ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास या संदर्भात रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रबंधक शरद मोरे यांनी जळगाव रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार रेल्वे कर्मचारी सचिनकुमार भावसार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन शेख यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. जळगाव रेल्वे पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. नातेवाईकांनी ओळख पटवून रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव रेल्वे पोलीस यांनी केले आहे. या प्रकरणी रेल्वेस्टेशन प्रबंधक शरद मोरे यांच्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिनकुमार भावसार करीत आहे.