‘बुध्दम शरणं गच्छामी’च्या जयघोषात बुध्दमुर्तीची शोभायात्रा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील सुप्रीम कॉलनीतील प्रबुध्द नगरात ८ फुटाच्या अष्टधातू सोन्याचा मुलामा असलेल्या भव्य बुध्दमुर्तीची स्थापना करण्यात आली. तत्पुर्वी या मुर्तीची रविवारी १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ‘बुध्दम शरणं गच्छामी’च्या जयघोषात बुध्दमुर्तीची शोभायात्रा काढण्यात आली.

 

या शोभायात्रेत बौध्द धम्मगुरूत पुज्यभंदन सुगतवंसजी महाथेरो, करूनानंदजी थेरो, ज्ञानरक्षीतजी थेरो, धम्मबोधीजी थेरो, रत्नसंघजी थेरो आणि एन. धम्मनंजी  थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती.  जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील प्रबुध्द नगरात २४ हजार स्क्वेअर फूट परिसराच्या नालंदा बुध्दविहार येथे तथागत भगवान गौतम बुध्दांची आठ फूटाच्या अष्टधातूची सोन्याचा मुलामा असलेली भव्य मुर्तीची स्थापना रविवारी १९ मार्च रोजी करण्यात आली. विशेष म्हणजे ही मुर्ती थायलंड येथून आणण्यात आली आहे. यासाठी थायलंड येथील गगन फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. अशी माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संदीप शिरसाठ यांनी दिली.

Protected Content