जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून दोन भावांमध्ये हाणामारी होवून दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार १५ मार्च रोजी रात्री उशीरा जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नरेंद्र बद्रीनरायण बुळे (वय-५०) रा. नगरखाना, जामनेर, हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी त्यांचा भाऊ गोपाल बद्रीनारायण बुळे हे राहतात. गेल्या काहि दिवसांपासून गोपाल बुळे याची पत्नी माहेरी गेलेली होती. पत्नीला माहेरहून घेवून येण्यास गोपल बुळे याने भाऊ नरेंद्र बुळे यांना सांगितले. त्यावर नरेंद्र बुळे याने नकार दिला. याचा राग आल्याने गोपालने टिकावच्या दांड्याने नरेंद्रला मारहाण करून हाताला दुखापत केली. तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या कावेरी बुळे यांना शिवीगाळ करून तुमचा मर्डर करून टाकीन अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर नेरंद्र बुळे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोपाल बद्रिनारायण बुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ जयेंद्र पगारे करीत आहे.