धानवड येथे दोन कुटुंबात तुफान हाणामारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड गावात दुकाने बांधकाम करण्यावरून दोन कुटुंबात लाकडी दांडक्याने एकमेकांना बेदम हाणामारी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील धानवड गावातील बसस्थानकाजवळ बांधकाम केलेल्या जागेच्या कारणावरून हा वाद झाला. यात विलास संतोष पाटील (वय-६०)यांनी दिलेल्या पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवार ११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते घरी असतांना शेजारी राहणार भरत देवीदास पाटील हा तिथे आला. दुकानाचे बांधकाम आमच्या जागेवर का केले, असे सांगून भरत देविदास पाटील आणि रंजना प्रकाश पाटील यांनी शिवीगाळ करून लाकडी दांडका डोक्यात मारून दुखापत केली.  तर दुसऱ्या फिर्यादीत रंजना प्रकाश पाटील (वय-५६) यांनी म्हटले आहे की, दुकानचे शटर लावत असल्याचा रागातून विलास संतोष पाटील आणि सुशिलाबाई विलास पाटील यांनी शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी रविवारी १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून परस्परविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात विलास संतोष पाटील, सुशिला विलास पाटील, भरत देवीदास पाटील आणि रंजना प्रकाश पाटील सर्व राहणार धानवड ता.जि.जळगाव यांच्या विरोधात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी करीत आहे.

Protected Content