Home क्राईम अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण


भडगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शनिवारी ४ मार्च रोजी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. शुक्रवार ३ मार्च रोजी अल्पवयीन मुलगी ही घरी असतांना सकाळी ९ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तीला फूस लावून अपहरण केले. सायंकाळी साडेपाच वाजता पिडीत मुलीचे नातेवाईक हे घरी आल्यावर मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी ४ मार्च रोजी पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात शनीवारी ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.


Protected Content

Play sound