Home Uncategorized चैतन्य तांड्यातील शेतकऱ्याच्या झोपडीला आग!

चैतन्य तांड्यातील शेतकऱ्याच्या झोपडीला आग!

0
35

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांडा येथील एका शेतकरी वास्तव्यास असलेल्या झोपडीला अचानक आग लागल्याची थरारक घटना आज घडली आहे. यात रोकडसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक सदर कुटुंब हे उघड्यावर आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चैतन्य तांडा येथील शेतकरी अनिल नंदा चव्हाण या शेतकऱ्याची बिलाखेड शिवारात शेतजमीन आहे. यामुळे चव्हाण कुटुंबांनी शेतातच एक झोपडी बांधून त्याठिकाणी वास्तव्याला आहे. दरम्यान रात्री घरात दिवा लावलेला असताना अचानक झोपडीला आग लागली. यानंतर काही क्षणातच होतेचे नव्हते झाले. १० हजार रुपये रोकडसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाली. मात्र यावेळी सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. तत्पूर्वी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चव्हाण कुटुंब हे उघड्यावर आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. परंतु सदर कुटुंबियांना तत्काळ शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound