बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील लाचखोरी प्रकरणात पोलिस हवालदाराच्या अजून एका पंटरावर गुन्हा दाखल झाला असून तो पसार झाल्याचे वृत्त आहे.
बोदवड तालुक्यातील पत्रकारासह चौघांविरोधात दाखल गुन्ह्यात बी वा सी फायनल पाठवण्यासह चॅप्टर केस स्थानिक स्तरावर करण्यासाठी हवालदार वसंत नामदेव निकम यांनी पंटराच्या माध्यमातून १६ हजारांची लाच स्वीकारली होती. या प्रकरणात हवालदार वसंत नामदेव निकम (५२, आयटीआय कॉलनी, जामनेर) यांच्यासह खाजगी पंटर एकनाथ कृष्णा बावस्कर (६५, रा.जलचक्र बु.॥ यांना शनिवारी दुपारी अटक करण्यात आली होती. या दोघांना आज भुसावळ न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, याच प्रकरणात शिवाजी ढोले या पंटराचे देखील नाव समोर आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा पंटर पसार झाला असून पोलीस त्याचा तपास घेत आहेत.