Home क्राईम प्रज्ञा नगरातून इन्व्हर्टरसह बॅटरीची चोरी

प्रज्ञा नगरातून इन्व्हर्टरसह बॅटरीची चोरी

0
111


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रज्ञा नगरातील बंद घरातून चोरट्यांनी बॅटरी व इन्व्हर्टर असा एकूण ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन लक्ष्मण देवरे (वय-४१) रा. प्रज्ञा नगर निमखेडी शिवार जळगाव हे आपले आई यांच्यासह वास्तव्याला आहे. सचिन देवरे हे १२ एप्रिल रोजी आईसोबत बाहेरगावी राहत असलेल्या भावाकडे घराला कुलूप लावून गेले होते. एक महिन्यानंतर म्हणजे गुरूवार १२ मे रोजी सकाळी जळगाव ते राहत्या घरी आले. त्यावेळी त्यांच्या घरातील इन्वर्टर व बॅटरी असा एकूण ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. याबाबत सचिन देवरे यांनी तातडीने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी १२ मे रोजी रात्री १२ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.03:13 PM


Protected Content

Play sound