Home Cities अमळनेर आनंद नगरातील बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

आनंद नगरातील बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील आनंद नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत गुरूवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र लक्ष्मण देशमुख (वय-६८) रा. आनंद नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचे घर बंद करून ८ फेब्रुवारी रोजी गावाला निघून गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून मध्यरात्री घरफोडी करून मुद्देमाल लांबविला. घरातून सेवानिवृत्तीचे मुळे पेन्शन ऑर्डरचे कागदपत्र, ८ हजार रूपये किंमतीची दुचाकी आणि १० हजारांची रोकड असा एकुण १८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर रविंद्र देशमुख यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हटकर करीत आहे.


Protected Content

Play sound