जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापुरा भागात असलेल्या एका तरुणाची घरासमोरून लावलेली २० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अबरार इंदाज पिंजारी (वय-३१) रा. मोहम्मद नगर, तांबापुर जळगाव हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजता त्यांनी त्याची दुचाकी (एमएच १९ डीबी २३१३) ही घरासमोर पार्किंग करून लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.१५ वाजता उघडकीला आला आहे. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे करीत आहे.