कळमसरेत सेवालाल महाराज जयंती साजरी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधीत ऊस तोड करणाऱ्या बंजारा समाज बांधवानी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

१५ जानेवारी रोजी बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची जयंती असल्याने चाळीसगाव तालुक्यातील कृष्णपुरी येथील शेतात मुक्कामाला असलेल्या ऊस तोड बंजारा समाज बांधव यांनी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली. यावेळी विविध काकार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन भिकेसिंग जतनसिंग पाटील, खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा कळमसरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मुरलीधर महाजन प्रतिमा पूजन यांनी केले.

ऊस तोडी कामगाराचे प्रमुख (मुकादम) एकनाथ ताराचंद राठोड यांनी संत श्री सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला नैवेद्य दाखवले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्ही.पी.महाजन यांनी केले. शारदा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक आर.जी.राठोड यांनी संत सेवालाल महाराजांचा संपूर्ण इतिहास वर्णन करून सांगितला. त्या प्रसंगी आपल्या कळमसरे गावातील  सरपंच जगदीश निकम, खान्देश माळी महासंघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष मुरलीधर महाजन, रविंद्र महाजन व ऊसतोड बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन एकनाथ ताराचंद राठोड यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content