भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तिचा पती आणि मुलगा यांना बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात ५० वर्षीय महिला ही आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. महिलेचा मुलाने दुचाकीवर बसविल्याचा कारणावरून सौरभ संभाजी थोरात, अनिल विक्रम थोरात आणि सुनिल विक्रम थोरात यांनी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता महिलेला, मुलाला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली. यात महिलेचे अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. तसेच दुसऱ्या दिवशी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा महिलेचे पती व मुलगा यांना पुन्हा मारहाण केली. तसेच तिघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेने बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात सौरभ संभाजी थोरात, अनिल विक्रम थोरात आणि सुनिल विक्रम थोरात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जिजाबराव पवार हे करीत आहे.