जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कोल्हे नगर परिसरातील बंद घर फोडून घरातून २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, समिर संजय तडवी (वय-२४) रा. सावखेडा सिम ह.मु. कोल्हे नगर, जळगाव हे वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सामान अस्तव्यस्त केला. घरातील २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. समिर तडवी हे घरी आल्यावर चोरट्यांनी घरातून लॅपटॉप चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.