Home Cities जळगाव मविआचे उमेदवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज : शक्ती प्रदर्शनाची तयारी

मविआचे उमेदवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज : शक्ती प्रदर्शनाची तयारी

0
103


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव व रावेरातून अनुक्रमे करण पाटील व श्रीराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शनाचे नियोजन केले आहे.

महाविकास आघाडीने करण पाटील यांना जळगावातून तर श्रीराम पाटील यांना रावेरातून मैदानात उतरवले असून दोन्ही उमेदवारांनी गाठीभेटींसह मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार सुरू देखील केलेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात मंगळवार दिनांक २४ रोजी मविआचे दोन्ही उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

याप्रसंगी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी हे देखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना-उबाठाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती याप्रसंगी लाभणार आहे. तर, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खर्‍या अर्थाने प्रचारात रंग भरणार आहेत.


Protected Content

Play sound