Home क्राईम वडली येथून ट्रक्टरच्या ट्रॉलीची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

वडली येथून ट्रक्टरच्या ट्रॉलीची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

0
129


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडली शिवारातून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची चोरी केल्याचे उघडकीला आले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, प्रदीप प्रेमराज पाटील (वय-४७) रा. वडली ता.जि.जळगाव हे शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे ट्रॅक्टर आणि (एमएच १९ एएन ६७२९ ) क्रमांकाची ट्रक्टर ट्रॉली आहे. २६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान त्यांनी त्यांच्या मालकीची ट्रॉली वडली शिवारातील त्यांच्या शेताच्या बाजूला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ट्रक्टरची ट्रॉलीची चोरी केल्याची घटना उघडकीला आली होती. याप्रकरणी सहा महिन्यानंतर रविवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाही ७.१५ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील करीत आहे. 

 


Protected Content

Play sound