जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प सादर केला आहे. एकूणच केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणीही व्हावी हिच अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसमावेशक विकास, वंचित घटनांना प्रधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक,क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सप्त घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली असल्याचे प्रतिबिंब दिसत आहे. आरोग्य, शेती क्षेत्र आणि युवापिढीसाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांचा प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र उभारणीची घोषणा ही स्वागतार्ह आहे. कोरोना काळातील परिस्थीती लक्षात घेता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशभरात १५७ नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आरोग्य क्षेत्राला मोठा आधार मिळणार आहे. डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ह्या शेती क्षेत्रासाठी एक आशेचा किरण ठरणारा वाटतो. आर्थिक गुंतवणूकीत महिलांचाही सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी २ लाखांपर्यतच्या सवलत दिली आहे. एकूणच केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणीही व्हावी हिच अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी दिली.