भविष्यातील मंदीबाबत उपाययोजनांचा अभाव – डॉ. उल्हास पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भविष्यातील मंदीचा सामना कसा करावा लागेल या उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे. अशी प्रतिक्रीया गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भविष्यातील मंदीचा सामना कसा करावा लागेल या उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन नोकरदार वर्गाला खुष करण्यासाठी आयकराची मर्यादा वाढविण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या खिशातील पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेती क्षेत्रात मोठे आर्थिक नुकसान बळीराजाला सोसावे लागले आहे. अशा परिस्थीतीत शेतकर्‍याचे उत्पन्न वाढावे यासाठी ठोस उपाययोजना दिसून येत नाही. तसेच जागतिक मंदीचे सावट लक्षात घेता आर्थिक विषयांवर फारसा विचार झालेला दिसत नाही. निव्वळ घोषणाबाजी करून देशातील जनतेची आजच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा दिशाभूल झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.

Protected Content