बंद घर फोडून ९७ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भिकमचंद जैन नगरातील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी ३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता समोर आली. या संदर्भात सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सागर अनिल कुरकुरे वय-३३ रा. भिकमचंद जैन नगर, जळगाव ह.मु. पुणे ता.जि. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत घराचे कडी कोयंडा तोडून घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार रविवारी ३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता उघडकीला आला. दरम्यान सागर कुरकुरे यांनी शहर पोलीस ठाण्यात चोरी झाल्याबाबत तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Protected Content