भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कनाशी येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनराज रूपला पाटील (वय-७५) रा. कनाशी ता. भडगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उतरनिर्वाह करत असतात. २७ जानेवारी रोजी रात्री १० ते २८ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ते घरात झोपलेले असताना. अज्ञात चोरट्याने बंद घरात घसून त्यांच्या घरात ठेवलेले ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात त्यांनी धनराज पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जिजाबराव पवार करीत आहे.