भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे आधीन अनेक रेल्वेगाड्या रद्द होत वा विलंबाने धावत असतांना आता भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस तब्बल दोन महिने बंद राहणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल्वे गाडी क्रमांक ११०२५ आणि ११०२६ अर्थात पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस ही भुसावळसह जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव स्थानकांवरून कल्याणमार्गे पुणे येथे जाण्यासाठी अतिशय महत्वाची गाडी आहे. या ट्रेनमुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची सुविधा होत असते. मात्र आजपासून तब्बल दोन महिन्यापर्यंत ही रेल्वे गाडी बंद राहणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे.
कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमॉडेलींगच्या कामामुळे हुतात्मा एक्सप्रेस दोन महिने बंद राहणार असल्याचे रेल्वेने नमूद केले आहे. अर्थात, दोन महिन्यांपर्यंत प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तर, या कालावधीत किमान पनवेलपर्यंत जाणारी तात्पुरती एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.