Home Uncategorized शहरापूर धरणावरून ईलेक्ट्रीक केबल वायरची चोरी

शहरापूर धरणावरून ईलेक्ट्रीक केबल वायरची चोरी

0
36


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर तालुक्यातील शहापूर धरणाच्या परिसरातून शेतकऱ्याची १० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.  या प्रकरणी गुरुवारी १९ जानेवारी दुपारी २ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रल्हाद रामदास वाघ (वय-५३, रा. शहापूर ता.जामनेर जि.जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शहापूर शिवारातातील धरणाजवळ त्यांचे शेत आहे. या धरणातून पाणी नेण्यासाठी त्यांनी ईलेक्ट्रीक मोटारीच्या मदतीने पीकांना पाणी देतात. दरम्यान, १८ जानेवारी रोजी रात्री ८ ते १९ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपये किंमतीचे ५३० फूट ईलेक्ट्रीक केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी प्रल्हाद वाघ यांनी परिसरात शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार १९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जामनेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुरुवार १९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेया घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक रामदास कुंभार करीत आहे

 


Protected Content

Play sound