जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील डोहरीतांडा येथील अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता एकावर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १५ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीला गावातील नितेश शंकर राठोड याने त्याच्या घरी बोलावले. त्यानंतर मुलीसोबतल अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तु जर तुझ्या आईचे सोन्याचे दागिने आणले नाही तर मी गावात तुझी बदनामी करेल व माझ्या मोबाईल मधील फोटा व्हायरल करेल अशी धमकी देत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नितेश राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.