त्यांच्यातला स्वाभीमान संपलाय ! : राऊतांचे गुलाबराव पाटलांचा प्रत्युत्तर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोळीची उपमा देतांनाच गुलाबराव पाटील यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या मिशन-१४४ या मोहिमेवर भाष्य करतांना आमच्या पक्षाला शून्य जागा मिळाल्या तरी चालतील असे वक्तव्य केले होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर आज भाष्य केले आहे.

आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना खासदार संजय राऊत म्हणालेत की, ”जे मिंधे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वत:चं अस्तित्वच नसतं. ते भाजपामध्ये विलीन झाले आहेत. त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. त्यांना शिवसेनेबरोबर भाजपाची युती करायची होती. पण आता ते आपला पक्ष भाजपात विलीन करत आहेत. त्यामुळे त्यांना एकही जागा नकोय. शिवसेना मात्र यापुढेही संघर्ष करत राहील.”

खासदारा राऊत पुढे म्हणाले की, ”त्यांचा एक गट आहे. टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसतं. टोळी गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते. हे स्वत:ला टोळी मानत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांना एकही जागा नको. जितके दिवस आहेत, तितके दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल” असा टोला खासदार संजय राऊत यांनी मारला.

Protected Content