Home Cities अमळनेर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ३१ डिसेंबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील तालुक्यातील जवखेडा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ डिसेंबर रोजी रात्री मुलगी घरात झोपलेली असतांना गावातील सुरेश दयाराम मालचे याने फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. अल्पवयीन मुलीचा सर्व शोध घेतला परंतू मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर ३१ डिसेंबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात सुरेश दयाराम मालचे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound