Home करियर म्युनिसिपल हायस्कूलमधून खुशी होले सर्व शाखेत प्रथम

म्युनिसिपल हायस्कूलमधून खुशी होले सर्व शाखेत प्रथम

yawal school
yawal school

yawal school

 

फैजपूर प्रतिनिधी । येथील म्युनिसिपल हायस्कूलचा 12 वीचा निकाल 93.2 टक्के लागला असून सायन्सची विद्यार्थीनी खुशी दीपक होले हिने शाळेत सर्व शाखेतून 83.38 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असून ती डी. एन. कॉलेज केंद्रातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
विज्ञान शाखेचा निकाल 96.2 टक्के लागला असून प्रथम खुशी दीपक होले 83.38 टक्के तर तृप्ती प्रभाकर सूर्यवंशी 79.53 टक्के गुणांनी व्दितीय तर तृतीय  नेहा रविंद्र महाजन 79.38 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. दीपक होले सर व  कल्पना मॅडम यांची कन्या आहे. वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक आनंद रवींद्र जगताप याने 68.30 टक्के गुण मिळवून तर रुपाली संजय चिरमाडे 68.15 टक्कांनी व्दितीय तर शिवानी अशोक बहारे 67.38 टक्के मिळवून तिसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून निकिता प्रभाकर बोरोले 66.48 टक्के गुणांनी प्रथम तर द्वितीय सरताज अमानूल्ला तडवी 63.60 टक्के गुण मिळवले, तृतीय क्रमांक शाहरुख बाबू तडवी 60.00 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
खुशी होले हिचे या यशाबद्दल मुख्याध्यापक आर. एल. आगळे सर, पर्यवेक्षक एस. ओ. सराफ सर, जेष्ठ शिक्षक वाय. एस. महाजन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगराध्यक्षा महानंदाताई होले, शालेय समिती अध्यक्ष, मिलिंद वाघुळदे, शिक्षण सभापती वत्सला कुंभार आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांनी कौतुक केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound