Home Cities जळगाव बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश पाटील

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश पाटील

0
64

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर सर्व आमदार हे शिंदे गटात गेले असले तरी बहुतांश पदाधिकारी हे मात्र उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याचे चित्र होते. यातच गेल्या अनेक महिन्यांपासून बाळासाहेबांच्या शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणीची घोषणा रखडली होती. या अनुषंगाने आज पक्षाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. यात पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आधी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष होते. आता त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत बढती मिळाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. तर गणेश सोनवणे आणि कुंदन काळे यांची महानगरप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, आज जिल्हा महिला संपर्क प्रमुखपदी सौ. सरीता कोल्हे-माळी यांची निवड करण्यात आली आहे. तर महिला महानगराध्यक्षपदाची धुरा ही ज्योती शिवदे आणि शोभाताई चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.


Protected Content

Play sound